Advertisement

राज्यात शुक्रवारी ६९ हजार रुग्ण बरे

राज्यात शुक्रवारीही आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा आहे.

राज्यात शुक्रवारी ६९ हजार रुग्ण बरे
SHARES

राज्यात शुक्रवारीही आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा आहे.  शुक्रवारी राज्यात कोरोनाचे ६२ हजार ९१९ नवीन रुग्ण आढळले.  तर ८२८ रुग्णांचा मृत्यू झाला.

 ६९ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुक्तांची संख्या अशीच वाढत राहिली तर येत्या काही दिवसांत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात ६० हजारांच्या वर रुग्णसंख्या स्थिरावली आहे. दिवसाला ५ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या होत असून त्यापैकी ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटीव्ह सापडत आहेत.  मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या संवादात तिसऱ्या लाटेसाठी महाराष्ट्र सज्ज असून लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.



हेही वाचा

जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?

गर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा