Advertisement

महाराष्ट्रातील ७० टक्के रुग्ण 'या' ५ जिल्ह्यातील

५ ते १४ सप्टेंबर या कालावधीत पाच जिल्ह्यांमध्ये एकूण बाधितांपैकी ७० टक्के बाधितांची नोंद करण्यात आली.

महाराष्ट्रातील ७० टक्के रुग्ण 'या' ५ जिल्ह्यातील
SHARES

महाराष्ट्रात दररोज कोविड च्या संसर्गामध्ये घट दिसून येत असताना ५ ते १४ सप्टेंबर या कालावधीत पाच जिल्ह्यांमध्ये एकूण बाधितांपैकी ७० टक्के बाधितांची नोंद करण्यात आली.

आठ जिल्ह्यांमधील साप्ताहिक संसर्ग दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात गुरुवारी ३५९५ इतक्या नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, ४५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत करोना संसर्गामुळे १ लाख ३८ हजार ३२२ इतक्या जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील करोना मृत्यू दर २.१२ टक्के इतका आहे.

मुंबईत, गुरुवारी ४४६ नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, दोन बाधितांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३६ हजार ७२८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, १६ हजार ३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात एकूण ४९ हजार ३४२ सक्रिय करोनाबाधित आहेत. गुरुवारी ३०८ जणांची भर पडली. राज्यात मागील २४ तासांमध्ये ३२४० जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

गुरुवारी ३५९५ करोना प्रकरणांची नोंद करण्यात आली. त्यातील २६६८ म्हणजे जवळपास ७४.२१ टक्के करोनाबाधितांची प्रकरणे ही मुंबई, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील आहे. अहमदनगरमध्ये ६१८ नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, पुण्यात ८९८, सोलापूरमध्ये २४१ नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. सातारामध्ये २३६ आणि सांगलीमध्ये २२९ बाधितांची नोंद करण्यात आली.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ५ ते १४ सप्टेंबर दरम्यान, पुणे, अहमदनगर, मुंबई, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ६९% सक्रिय प्रकरणे किंवा २५ हजार ७७६ प्रकरणे जोडली गेली आहेत.

उर्वरित ३० जिल्ह्यांनी याच कालावधीत ३१% सक्रिय प्रकरणांमध्ये (११,३२०) योगदान दिलं आहे. पुण्यात ८ हजार ०६२, तर अहमदनगरमध्ये ७ हजार ४८४, त्यानंतर मुंबई (४,०८७), सातारा (३,४३९) आणि सोलापूर (२,७०४) अशी आकडेवारी आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा