केमोथेरपीशिवाय स्तनाचा कर्करोग होणार बरा

'ऑन्कोटाईप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर' या चाचणीमुळे ही कर्करोगाची नेमकी किती आकाराची गाठ आहे आणि यासाठी केमोथेरपीसारख्या उपचाराची गरज आहे की नाही हे समजते. यामुळे ७० टक्के महिलांना त्यांना झालेल्या कर्करोगावर केमोथेरपीशिवाय उपचार करण शक्य झालं अाहे.

SHARE

महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. स्तनाच्या कर्करोगावर केमोथेरपी करणं अत्यावश्यक अाहे. मात्र,  केमोथेरपीचे दुष्परिणाम अनेक रुग्णांना भोगावे लागतात. परिणामी केमोथेरपीकडे अनेक महिला पाठ फिरवतात. पण अाता स्तनाच्या कर्करोगावर केमोथेरपीशिवाय उपचार होणं शक्य होणार आहे.  'ऑन्कोटाईप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर' या चाचणीतून पहिल्या टप्प्यातच कर्करोगाची तीव्रता समजणार अाहे. त्यामुळे अावश्यक उपचार करून कर्करोग बरा होऊ शकतो.

काय आहे नवी चाचणी ?

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं कधीकधी निदर्शनास येत नाहीत. कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात महिलांना ही कर्करोगाचीच गाठ आहे हे समजत नाही . 'ऑन्कोटाईप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर' या चाचणीमुळे ही कर्करोगाची नेमकी किती आकाराची गाठ आहे आणि यासाठी केमोथेरपीसारख्या उपचाराची गरज आहे की नाही हे समजते. यामुळे ७० टक्के महिलांना त्यांना झालेल्या कर्करोगावर केमोथेरपीशिवाय उपचार करण शक्य झालं अाहे.


१०,२७३ महिलांचे नमुने

या चाचणीच्या संशोधनामध्ये भारताव्यतिरिक्त इतर सहा राष्ट्रांमधून १०,२७३ स्तनाच्या कर्करोगाने पिडीत महिलांचे नमुने घेतले. वेगवेगळ्या देशातील जीवनशैलीमुळे मानवी शरीर रचनादेखील वेगवेगळ्या आहेत.  त्यामुळे वेगवेगळ्या डीएनएच्या चाचण्या करणं शक्य झालं.  'ऑन्कोटाईप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर'  ही स्तनाच्या कर्करोगाची चाचणी या महिलांवर प्राथमिकरित्या करण्यात आली.


अमेरिकेत झालेल्या संशोधनामध्ये महिलांमधील स्तनाच्या कर्करोगावर केमोथेरपीशिवाय कशाप्रकारे उपचार होऊ शकते, यावर संशोधन करण्यात आलं आहे. केमोथेरपीमध्ये रुग्णाला केस गळणे, अस्वस्थपणा, वजन घटणे या सर्व व्याधींना सामोरं जावं लागतं. पण या चाचणीमुळे या व्याधींपासून मुक्तता मिळणार आहे.
- डॉ. प्रसाद वैद्य,  मुख्य कार्यकारी अधिकारी, मेडिलिक्सविज्ञानाच्या प्रगतीमुळे कर्करोगावर वेगवेगळ्या प्रकारे उपचार करणं शक्य झालं आहे. 'ऑन्कोटाईप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर'  या चाचणीमुळे केमोथेरपीसारख्या किचकट आणि खर्चिक थेरपीपासून रुग्णाची नक्कीच सुटका होईल.
- पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, कर्करोगतज्ज्ञहेही वाचा -

आरोग्यसेविकांचं आझाद मैदानात आंदोलन 

महिलेच्या पोटातून काढली १० किलोची गाठ
संबंधित विषय
ताज्या बातम्या