Advertisement

आरोग्यसेविकांचं आझाद मैदानात आंदोलन


आरोग्यसेविकांचं आझाद मैदानात आंदोलन
SHARES

मुंबईकरांच्या आरोग्याची कळजी घेत गल्लीबोळातून फिरणाऱ्या आरोग्यसेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्यामुळे मुंबईतील 4000 आरोग्यसेविका आझाद मैदानावर धडकणार आहेत. किमान वेतन, प्रसुती रजा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे या मागण्यांसाठी आरोग्यसेविकांनी हे आंदोलन छेडलं आहे.


4000 आरोग्यसेविकांचा समावेश

यासदंर्भात 1 ऑगस्ट रोजी मुंबई आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र बैठकीत काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे या आरोग्यसेविकांनी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात १८६ आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या चार हजार महिला आरोग्य सेविका सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली. यापूर्वी ६ जुलै रोजी आरोग्यसेविकेंनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या समोर आंदोलन केलं होतं. मात्र तोडगा काही निघाला नाही.

आरोग्यसेविकांना दरमहा 5 हजार इतकं वेतन दिलं जातं. हे वेतन वाढून किमान 13 हजार इतकं व्हावं आणि प्रसूती रजा व कंत्राटी आरोग्यसेविकांना आरोग्यसेवेत कायम करून घेणे या प्रमुख मागण्या आहेत.


'तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार'

आरोग्य सेविकांच्या विविध मागण्या पर्ण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. त्यामुळे थोड्या प्रमाणात जागरुकता झाली आहे. परंतु, पालिकेनं अजूनही दखल घेतलेली नाही. कायद्यानुसार आरोग्यसेविकांना किमान वेतनाचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. पण तरीही तो मिळत नाही. असं असताना पालिका अधिकारी गप्प आहेत. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पालिकेच्या आशासेविका संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देविदास यांनी दिला आहे.   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा