Advertisement

राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण बरे

राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ५१ लाख ७९ हजार ९२९ झाला आहे. यापैकी ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण बरे
SHARES

राज्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन ४० हजार ९५६ रुग्ण आढळले. तर तब्बल  ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ५१ लाख ७९ हजार ९२९ झाला आहे. यापैकी ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७७ हजार १९ रुग्णांनी जीव गमावला आहे. राज्यात सध्या ५ लाख ५८ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मुंबईत मंगळवारी १७१७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६०८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ४१ हजार १०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ६ लाख २३ हजार ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७० दिवसांवर वर गेला आहे. 

सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१ लाख ७९ हजार ९२९ ( १७.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ९१ हजार ७८३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २९ हजार ९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



हेही वाचा

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा