Advertisement

धारावीतील ७५ टक्के रुग्ण अत्यावश्यक सेवेतील

धारावीत सोमवारी नवीन ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावातील रुग्णांची संख्या आता १५८३ झाली आहे.

धारावीतील ७५ टक्के रुग्ण अत्यावश्यक सेवेतील
SHARES

धारावीत सोमवारी नवीन ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावातील रुग्णांची संख्या आता १५८३ झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण अत्यावश्यक सेवेतील आहेत. सफाई कामगार, वॉर्डबॉय, सामान घरपोच करणारे कामगार अशा रुग्णांचा समावेश असल्याचं सर्वेक्षणातून पुढे आले आहे. हे सर्व रुग्ण २१ ते ६० वयोगटातील आहेत. 

धारावीत रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अडीच किलोमीटर परिसरात पसरलेल्या धारावीतील झोपडपट्टीत सात लाख लोकं राहतात. एक किलोमीटर परिसरात अडीच लाख लोक इतकी दाट घनता या भागात आहे. चामडय़ाच्या वस्तू, मातीची भांडी आणि कपडे शिवण्याचे कारखाने या भागात मोठय़ा संख्येने आहेत. याच भागात मोठय़ा संख्येने कष्टकरी वर्ग आहे.

 धारावीत कोरोनाची लागण झालेले बरेसचे जण आरोग्य यंत्रणेत काम करणारे आहेत. त्यामुळे त्यांचा या आजाराशी रोजच जवळून संबंध येतो. धारावीचाच  भाग असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये पालिकेच्या कामगारांची मोठी वसाहत असून आतापर्यंत या भागात १८६ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर कुंभारवाडा, कुंची कुर्वे नगर, मुकुंद नगर, राजीव गांधी नगर अशा १७ वसाहतींमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण आढळत आहेत.

धारावीत आतापर्यंत 525 जण बरे झाले आहेत. तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २० जण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. तर १९ मृत हे ६० वर्षांंवरील आहेत.

हेही वाचा -

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा