Advertisement

Corona virus: राज्यात कोरोनाचे 790 नवे रुग्ण, तर 24 तासात 36 जणांचा मृत्यू


Corona virus:  राज्यात कोरोनाचे 790 नवे रुग्ण, तर 24 तासात 36 जणांचा मृत्यू
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे 790 नवे रुग्ण आढळून आले आहे. शनिवारी 121 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 9775 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर  रविवारी कोरोना या महामारीने 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 12 हजार 296 इतकी आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या  1 लाख 92 हजार  नमुन्यांपैकी  1 लाख 48 हजार 248 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर  12 हजार 296 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख  74  हजार 933 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 12 हजार 623 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर शनिवारी या महामारीने राज्यभरात 36 जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 521 इतकी झाली आहे.

शनिवारी मृत पावलेल्या 36 नागरिकांमध्ये मुंबईतील 27 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 3 आहेत. अमरावती शहरातील 2, तर वसई विरार व औरंगाबादमधील 1 व्यक्तीचा समावेश आहे.  या शिवाय पश्चिम बंगाल मधील एका व्यक्तीचा  मुंबईत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 28 पुरुष तर 8 महिला आहेत. शनिवारी झालेल्या 36 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 19 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत.  या 33 रुग्णांपैकी 23 जणांमध्ये (70 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा