Advertisement

मुंबईत पाचवे सेरो सर्वेक्षण सुरू, ८ हजार नमुने गोळा करणार

मुंबई महापालिकेने आतापर्यंत चार वेळा सेरो सर्वेक्षण पूर्ण केले आहे. पहिले व दुसरे सर्वेक्षण जुलै व ऑगस्ट २०२० मध्ये तीन प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले.

मुंबईत पाचवे सेरो सर्वेक्षण सुरू, ८ हजार नमुने गोळा करणार
SHARES

मुंबईमध्ये गुरुवारपासून पाचव्या सेरो सर्वेक्षणाला सुरुवात झाली. या सर्वेक्षणात ८ हजार रक्त नमुने संकलित करून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल.

तिसरी संभाव्य लाट आणि कोरोना लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांमधील अँटिबॉडीजचे प्रमाण पाहण्यासाठी महापालिकेच्या २४ वॉर्डमधील पालिका दवाखान्यांमार्फत पाचवे सेरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. 

मुंबई महापालिकेने आतापर्यंत चार वेळा सेरो सर्वेक्षण पूर्ण केले आहे. पहिले व दुसरे सर्वेक्षण जुलै व ऑगस्ट २०२० मध्ये तीन प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले, तर तिसरे सर्वेक्षण मार्च २०२१ मध्ये आणि चौथे सर्वेक्षण लहान मुलांकरीता मे ते जून २०२१ या कालावधीत झाले.

आता पाचवे सिरो सर्वेक्षण गुरुवारपासून हाती घेण्यात आले असून. यामध्ये ८ हजार नमुने संकलित करून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यांची चाचणी शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येणार आहे.

लसीकरण मोहीमही सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रतिपिंडाचे  प्रमाण पाहणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील महानगरपालिका दवाखान्यांमार्फत पाचवे सेरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.  बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक वैद्यकीय व्यावसयिकांद्वारे  त्यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल. आयडीएफसी आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा