Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी ८१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी (२५ ऑक्टोबर) ८१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ११० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी ८१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी (२५ ऑक्टोबर) ८१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ११० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये नवीन पनवेल आणि तळोजा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२, नवीन पनवेल ६, खांदा काॅलनी १, कळंबोली १३, कामोठे ७, खारघर २४, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ९, नवीन पनवेल १६, कळंबोली १५, कामोठे ३४, खारघर ३२ तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३०४९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१६०२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ९१२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा- 

मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण, संजय राऊतांची कारवाई करण्याची मागणी

भाजपला मोठा झटका! खडसेनंतर या 'बंडखोर' आमदाराने ठोकला रामरामसंबंधित विषय
Advertisement