Advertisement

विक्रमी २३ मिनिटांत केली 'रेडिओलॉजी सर्जरी'


विक्रमी २३ मिनिटांत केली 'रेडिओलॉजी सर्जरी'
SHARES

एचसीजी अॅपेक्स कॅन्सर सेंटरच्या डॉक्टरांनी ९० मिनिटांची रेडिओलॉजी शस्त्रक्रिया अवघ्या २३.७ एवढ्या कमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे. ट्रायजेमिनल न्यूराग्लिया या आजाराने त्रस्त असलेल्या ८२ वर्षांच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.


१५ वर्षांपासून होता त्रास

पुण्यात राहणारे इब्राहीम खान मागील १५ वर्षांपासून 'ट्रायजेमिनल न्यूराग्लिया' या आजाराने त्रस्त होते. गेल्या २ वर्षांपासून त्यांचा हा आजार बळावला होता. त्यांच्या कवटीच्या मज्जातंतूंना इजा झाल्याने त्यांना असह्य वेदना होत होत्या.

पण, या आजाराचं नेमकं कारण त्यांच्या कुटुंबीयांना कळत नव्हतं. खान यांना चार मुली असून त्यापैकी एक मुलगी डॉक्टर आहे. ती त्यांच्यावर अनेक वष॓ औषधोपचार करत होती. पण दोन वषा॓ंपासून हा त्रास वाढू लागल्याने वैद्यकीय तपासणीत त्यांना 'ट्रायजेमिनल न्यूराग्लिया' हा आजार असल्याचं निदान झालं.


वैद्यकीय उपकरणाचा वापर न करता शस्त्रक्रिया

मुंबईत या आजारावर उपचार होतात हे माहीत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बोरिवली येथील एचसीजी अॅपेक्स कॅन्सर सेंटरमध्ये आणलं आणि ३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. कोणत्याही वैद्यकीय उपकरणाचा वापर न करता रेडिओ शस्त्रक्रियेद्वारे अवघ्या २३.७ मिनिटांत ही शस्त्रक्रिया करण्यात आली.


अनेक वषा॓ंपासून माझ्या वडिलांना चेहऱ्यावरील नसदुखीचा त्रास होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून घेतले पण काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार मुंबईतील डॉ. शंकर यांच्याकडे आणलं. या डॉक्टरांनी रेडिओ शस्त्रक्रिया (लेझर द्वारे) केली. आता वडिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही.

- अफरून पठाण, मुलगी


ट्रायजेमिनल न्यूराग्लिया हा आजार जीवघेणा आहे. या आजारात कवटीच्या मज्जातंतूला इजा होत असल्याने मेंदूत तीव्र वेदना होतात. डोक्याला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या दाबल्याने आणि धमन्या आकुंचन पावल्याने हा आजार होतो.

- डॉ. शंकर वंगीपुरम, विभाग प्रमुख, रेडिएशन ऑकोलॉजी, एचसीजी अॅपेक्स कॅन्सर सेंटर   


काय आहे ट्रायजेमिनल न्यूराग्लिया?

ट्रायजेमिनल न्यूराग्लिया हा आजार पन्नाशीनंतर होतो. मासिक पाळी थांबल्यामुळे महिलांना हा त्रास प्रकषा॓ने जाणवतो. रक्तपेशी नसांवर सतत आघात करत राहिल्यानं हा आजार होतो. याशिवाय संसग॓ झाल्यासही हा आजार होतो.

खान यांच्या रक्तपेशींचा नसांवर आघात होत राहिल्याने त्यांना हा त्रास जाणवत होता. आमच्याकडे उपचारासाठी आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून लेझरद्वारे रेडिओ शस्त्रक्रिया करायचं ठरवलं. साधारणत: ही शस्त्रक्रिया करण्यासाठी ९० मिनिटे लागतात. पण एचसीजी अॅपेक्स कॅन्सर सेंटरमध्ये अवघ्या २३.७ मिनिटांत ही रेडिओ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. इतकंच नाही तर भारतात पहिल्यांदाच इतक्या कमी कालावधीत रेडिओ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावाही डॉ शंकर यांनी केला आहे.

शिवाय, या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. त्यामुळे रूग्ण लवकर डॉक्टरांकडे जात नाही. विविध डॉक्टरांकडून उपचार घेत राहतो आणि आजार बळावल्यावर रूग्ण डॉक्टरांकडे येतो. त्यामुळे सुरूवातीला या आजाराबाबत समाजात जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे.हेही वाचा - 

मद्यपान करताय... होऊ शकतो यकृताचा आजार

७० टक्के मुंबईकर व्यायामाबाबत आळशी, म्हणून बळावतोय हृदयविकार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा