Advertisement

राज्यात शुक्रवारी ८३३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले

राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात आज ८३३३ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात शुक्रवारी ८३३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले
SHARES

राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात आज ८३३३ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे. 

 ४९३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात २० लाख १७ हजार ३०३ जण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ६७ हजार ६०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६१ लाख १२ हजार ५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ३८ हजार १५४ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.२७ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ३ लाख १८ हजार ७०७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २ हजार ६८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ७८९९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या ७२७६ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२५७७, नाशिक येथे २१८५, अहमदनगर येथे १००१, औरंगाबाद येथे २०५२, नागपूर येथे ९ १४१, कोल्हापूर येथे २४० आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा