Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी कोरोनाचे ८४ नवीन रूग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (२० ऑक्टोबर) ८४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १४१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी कोरोनाचे ८४ नवीन रूग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (२० ऑक्टोबर) ८४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १४१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ७ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील ४, तसेच नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि खारघर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १४, नवीन पनवेल ८, खांदा काॅलनी १, कळंबोली १३, कामोठे १७, खारघर २७, तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १६ नवीन पनवेल २६, कळंबोली १६, कामोठे ४७, खारघर ३३ तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.  

दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २२५२६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २०९३० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०७५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा-  

Good News: सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, तर पुरूषांना…

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्य

Read this story in हिंदी
संबंधित विषय