Advertisement

मोठा दिलासा, मुंबईत मंगळवारी अवघे ९८९ नवीन रुग्ण

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आता दिसत आहे. मुंबईमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली आली आहे.

मोठा दिलासा, मुंबईत मंगळवारी अवघे ९८९ नवीन रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आता दिसत आहे.  मुंबईमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळूहळू घटत आहे. कडक लाॅकडाऊन आणि पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र आहे. 

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ९८९ रुग्ण आढळले. तर २२५८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत  ६४१५९८ रुग्ण बरे झाले आहेत.   मुंबईत सध्या ३२९२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी २५५ दिवस झाला आहे. 

यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. मार्च, एप्रिल महिन्यात दरदिवसाला कोरोनाचे ७ ते ११ हजार रुग्णांची नोंद झाली. त्याच दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यू, तसेच १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे मुंबईमधील रुग्णांची आकडेवारी कमी होऊ लागली आहे. 



हेही वाचा -

मुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा