Advertisement

लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो?, सीरमचे अदर पूनावाला यांनी दिले उत्तर

कोरोनाच्या लसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. नागरिकांमध्ये असलेला हा संभ्रम सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनीच दूर केला आहे.

लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो?, सीरमचे अदर पूनावाला यांनी दिले उत्तर
SHARES

व्हॅक्सीन टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. नागरिकांमध्ये असलेला हा संभ्रम सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनीच दूर केला आहे.

अदर पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? याचं उत्तर दिलं आहे.

"कोरोना लसचे नाव कोविडशील्ड आहे. या शील्डमुळे तुम्हाला आजार होण्यापासून रोखलं जावू शकणार नाही, ही लस घेतल्यास कोरोनामुळे तुमचा मृत्यू होणार नाही. या लसीमुळे तुम्ही गंभीर आजारापासून वाचू शकाल. एवढेच नव्हे तर ९५ टक्के केसेस मध्ये ही लस घेतल्यानंतर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. ही लस एकप्रकारची बुलेट प्रुफ जॅकेट सारखी आहे. गोळी लागल्यानंतर बुलेट प्रुफ जॅकेटमुळे माणूस मरत नाही, मात्र तुम्हाला थोडं फार डॅमेज होतं."

"व्हॅक्सीनमुळे तुम्हाला कोरोनाच होणार नाही, असं मी कधीच म्हटलेलं नाही. लोकांमध्ये कदाचित अशा प्रकारचा समज झाला असावा. आज अनेक व्हॅक्सीन आहेत. त्या तुमचा संसर्ग होण्यापासून बचाव करत असतील. परंतु ही व्हॅक्सीन तुमची सुरक्षा करते. डब्ल्यूएचओनेही या व्हॅक्सीनचं कौतुक केलं आहे. त्यामुळेच सर्वांना लसीकरण करून घेण्याची गरज आहे," असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान मुंबईत आज दिवसभरात ९ हजार २०० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर ५ हजार ९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृतांपैकी २८ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १९ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३४ दिवसांवर येऊन ठेपलाय. २ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर २ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३२ लाख ८८ हजार ५४० वर पोहोचली आहे. त्यातील २६ लाख ९५ हजार १४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ५७ हजार ३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या ५ लाख ३४ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



हेही वाचा

मुंबईत अवघ्या एका दिवसाचा लशीचा साठा शिल्लक- महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईतील 'हे' ७ विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा