Advertisement

मुंबईत अवघ्या एका दिवसाचा लशीचा साठा शिल्लक- महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईत बीकेसी जम्बो कोविड सेंटर, माहीम मॅटर्निटी सेंटर, नायर-सायन हाॅस्पिटल, अशा ठिकाणी करण्यात येणारं लसीकरण कोरोना प्रतिबंधाकत्मक लशी संपल्याने थांबवावं लागलं आहे.

मुंबईत अवघ्या एका दिवसाचा लशीचा साठा शिल्लक- महापौर किशोरी पेडणेकर
SHARES

मुंबईत बीकेसी जम्बो कोविड सेंटर, माहीम मॅटर्निटी सेंटर, नायर-सायन हाॅस्पिटल, अशा ठिकाणी करण्यात येणारं लसीकरण कोरोना प्रतिबंधाकत्मक लशी संपल्याने थांबवावं लागलं आहे. तर काही ठिकाणी अवघ्या एका दिवसाचा लशीचा साठा शिल्लक असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, कोरोना प्रतिबंधक लशीच्या पुरवठ्यावरून सध्या जे काही राजकारण सुरू आहे, त्यात मला बिलकूल पडायचं नाही. परंतु हा प्रकार त्वरीत थांबला पाहिजे. कारणं लोकं मुंबईतली असो, महाराष्ट्रातील किंवा देशातल्या कुठल्याही राज्यातील सर्वांनाच आपल्याला वाचवायचं आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात लशींचा पुरवठा होणं गरजेचं आहे. लशींचे जास्त डोस महाराष्ट्राला मिळावेत या महाराष्ट्राच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक दिसतात. परंतु त्यांच्या खालील प्रशासकीय यंत्रणा तितकीशी सकारत्मक आणि सतर्क दिसत नाही. त्याचा फटका महाराष्ट्राला (maharashtra) बसत असून या राजकारणात सर्वसामान्य जनतेचा हकनाक बळी जात आहे.

हेही वाचा- सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पुन्हा बंद होणार?

पहिल्या डोसचा फायदा काय?

सध्या मुंबईतील (mumbai) अनेक लसीकरण केंद्रावरील लशी संपलेल्या असून काही मोजक्या ठिकाणी फक्त एक दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. ज्या लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांचीही केंद्रावर दुसऱ्या लसीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दुसरा डोस न मिळाल्यास पहिल्या डोसचा काही उपयोग होणार आहे का? असे प्रश्न त्यांच्या मनात येत आहेत. तर या केंद्रावरील गर्दीमुळे कोरोना नसलेल्यांनाही संसर्ग होईल की काय? अशी भीती देखील किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. 

मुंबईसाठी ७६ हजार ते १ लाख लशीचे डोस येत असल्याची माहिती मला माध्यमांकडून समजली, अद्याप महापालिकेकडून (bmc) अधिकृत माहिती यायची आहे. परंतु हे डोस देखील अपुरे पडणारेच आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

(only one day stock available of covid 19 vaccine in mumbai says bmc mayor kishori pednekar)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा