Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पुन्हा बंद होणार?

संसर्ग आटोक्यात न आल्यास पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पुन्हा बंद होणार?
SHARES

महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या (coronavirusवाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यभरात विकेंड लाॅकडाऊनसह इतर दिवशीही कडक निर्बंध लागू केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठा, दुकाने, शाॅपिंग माॅल सक्तीने बंद ठेवण्यात आले आहेत. तरीही संसर्ग आटोक्यात न आल्यास पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेसेवा बंद होऊ शकते. यासंबंधीचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. 

शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेने (central railway) एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी या महत्त्वाच्या स्थानकातील प्लॅमटफार्म तिकीट तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे.  

यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे, पुढच्या १० दिवसांत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून १० लाखांवर पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व तऱ्हेच प्रयत्न अत्यंत कसोशीने करण्यात येत आहेत. परंतु हा संसर्ग इतका झपाट्याने फैलावत चाललाय की त्याला वेळीच आवर न घातल्यास मनुष्यबळ कमी पडू शकतं.

हेही वाचा- मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद

अशा परिस्थितीत विकेंड लाॅकडाऊन करण्यापलिकडे सरकारच्या हातात इतर कुठलेही पर्याय उपलब्ध नव्हते. सर्वसामान्य, नोकरदाऱ्यांच्या नोकरीधंद्यांचा विचार करून कोरोनाची लाट ओसरताच राज्य सरकारने सामान्य प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी दिली होती. परंतु सध्यस्थितीत उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, असं विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी स्पष्ट केलं. 

आठवड्याच्या सुरूवातीलाच राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी देखील काही निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांनुसार १० एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट बाळगणं बंधनकार करण्यात आलं आहे, रिपोर्ट नसल्यास प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड

  • ड्रायव्हरने गाडीत स्वत:ला प्लास्टिकच्या आवरणाने प्रवाशांपासून विगल केल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही
  • लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील जनरत डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई 
  • सर्व प्रवाशांना मास्क बंधनकारक, अन्यथा ५०० रुपये दंड 
  • आॅटो रिक्षात ड्रायव्हरसह २ प्रवाशांना परवानगी 
  • टॅक्सी ड्रायव्हरसह क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांनाच परवानगी
  • खासगी बसला सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेदरम्यान परवानगी 
  • अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता इतर खासगी वाहनांना शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेदरम्यान मनाई
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा