मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकातील प्लॅमटफाॅर्म तिकीट तातडीनं बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं (central railway) घेतला आहे. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. परिणामी वाढत्या कोरोनाला (coronavirus) आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन व राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व रेल्वे प्रशासनानं एका ठिकामी गर्दी न करण्याचं आवाहन केलं. परंतू, अनेक प्रवासी या वारंवार नियमांचं उल्लंघन करत आहे. शिवाय, कोरोनाचा धोका मुंबईत अधिक वाढत आहे. त्यामुळं नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व कोरोाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी ८९३८ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ४८ हजार ९०२ चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १८.२७ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८६ हजारांच्यापुढे गेली आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधी एक महिन्यावर आला आहे.
हेही वाचा -
लोकलच्या गर्दीचे व्हिडिओ खोटे; सोशल मीडियावर शेअर न करण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन
मेपासून सुरू होणार मुंबई, नवी मुंबई वॉटर टॅक्सी सेवा