Advertisement

मेपासून सुरू होणार मुंबई, नवी मुंबई वॉटर टॅक्सी सेवा

मुंबईसह नवीमुंबईतील चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रोपॅक्स फेरीचे ४ नवे मार्ग आणि वॉटर टॅक्सी सेवेचे १२ नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

मेपासून सुरू होणार मुंबई, नवी मुंबई वॉटर टॅक्सी सेवा
SHARES

मुंबईसह नवी मुंबईतील चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रोपॅक्स फेरीचे ४ नवे मार्ग आणि वॉटर टॅक्सी सेवेचे १२ नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. यापैकी भाऊचा धक्का ते बेलापूर, धरमतर, रेवस, जेएनपीटीदरम्यानची सेवा मेपासून सुरू करण्यात येणार आहे. तर उर्वरित मार्ग डिसेंबरअखेपर्यंत सुरू होणार आहेत. यामुळं मुंबई, नवी मुंबई आणि कोकणदरम्यानच्या रस्ते, रेल्वेवाहतुकीवरील भार कमी होणार आहे.

मुंबई (mumbai) आणि नवी मुंबई (navi mumbai) आणि रायगड (raigad) जिल्ह्यातील काही ठिकाणांपर्यंत वॉटर टॅक्सी सुविधा सुरू करण्यास चालना मिळाली आहे. ही सेवा खासगी चालकांमार्फत चालवली जाणार आहे. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॅटामरान, लाँच यांचा वापर केला जाईल अशी माहिती पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. यासाठी काही ठिकाणी जेट्टीचं काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी उर्वरित कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत असल्याचं समजतं.

सद्य:स्थितीत दक्षिण मुंबईतून कोकणातील काशिद इथं रस्ते मार्गे जाण्यासाठी १३४ किलोमीटर अंतर पार करावे लागते. त्यासाठी किमान ३.३० तास लागतात. जलमार्गानं हे अंतर केवळ ६० किमी असून रोपॅक्स सेवेनं काशिद इथं पोहचविण्यासाठी २ तास लागणार आहेत. ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. सध्या भाऊचा धक्का येथून मांडवा-अलिबागसाठी रोपॅक्स सेवा सुरू आहे. आता त्यामध्ये भाऊचा धक्का ते नेरुळ, भाऊचा धक्का ते मोरा आणि कारंजा ते रेवस या रोपॅक्स सेवाही डिसेंबरअखेपर्यंत सुरू होणार आहेत.

सध्या प्राथमिक स्तरावर भाऊचा धक्का ते बेलापूर, रेवस, धरमतर आणि जेएनपीटीकरिता मे महिन्यात टॅक्सी सेवा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या या टॅक्सीमधून एका वेळी १० ते १४ प्रवासी प्रवास करू शकतील. तर पुढील टप्प्यात एका वेळी ३० प्रवासी  प्रवास करू शकतील, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया येथून बेलापूर, वाशी येथे जाण्यासाठी टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

वॉटर टॅक्सी सेवा

प्रस्थान
अंतिम ठिकाण
जलमार्ग अंतर
वेळ 
भाऊचा धक्का
नेरुळ
१९
४० मिनिटे
भाऊचा धक्का
बेलापूर
२०
४५ मिनिटे
 भाऊचा धक्का
ऐरोली
३४
१ तास १५ मि.
भाऊचा धक्का
वाशी
२३
४० मिनिटे
भाऊचा धक्का
रेवस
१८
१ तास १५ मि.
भाऊचा धक्का 
कारंजा
१८
१ तास १५ मि.
भाऊचा धक्का
धरमतर
४० 
१ तास ३० मि.
भाऊचा धक्का
कान्होजी आंग्रे बेट
१९
४० मिनिटे
बेलापूर
ठाणे
२५
२० मिनिटे
बेलापूर
गेटवे ऑफ इंडिया
२३
२० मिनिटे
वाशी
ठाणे
१२
१५ मिनिटे
वाशी
गेटवे ऑफ इंडिया
२५
२० मिनिटे

रोपॅक्स सेवा मार्ग

प्रस्थान
अंतिम ठिकाण
जलमार्ग अंतर
वेळ
भाऊचा धक्का
नेरुळ
२४ किमी
१ तास
भाऊचा धक्का
काशिद
६०  किमी
२ तास
भाऊचा धक्का
मोरा
१०  किमी
३० मिनिटे
कारंजा
रेवस
३  किमी
१५ मिनिटे



हेही वाचा -

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा