Advertisement

लोकलच्या गर्दीचे व्हिडिओ खोटे; सोशल मीडियावर शेअर न करण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन

'लोकलमधून फक्त बसून प्रवास करता येईल. उभ्यानं प्रवास करण्यास मनाई', असं त्यांनी म्हटलं.

लोकलच्या गर्दीचे व्हिडिओ खोटे; सोशल मीडियावर शेअर न करण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. शहरात ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बमधांमुळं अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यामुळं कोरोना फक्त सामान्यांमुळंच वाढतो का? लोकलमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात तेव्हा कोरोना वाढत नाही का? असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख लोकलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला.

'लोकलमधून फक्त बसून प्रवास करता येईल. उभ्यानं प्रवास करण्यास मनाई', असं त्यांनी म्हटलं. शिवाय, रिक्षा आणि टॅक्सीमध्येही चालकासह फक्त २ प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आवाहनानंतर व राज्य सरकारच्या निर्बंधांनंतर देखील मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी जमल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. अनेकांनी त्यावर टीकाही केली. परंतू, हे व्हिडीओ जुने व खोटे असून, असे व्हिडीओ शेअर न करण्याचं आवाहन मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी म्हटलं.

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर सुरूवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात म्हणजे १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, लोकल सुरू केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढू लागला. कोरोनाच्या घसरलेले आकडे पुन्हा वाढले. 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा