Advertisement

"तर महाराष्ट्रात ३ आठवड्यांचं कडक लाॅकडाऊन"

वाढणाऱ्या रुग्णसंख्येकडे पाहता पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

"तर महाराष्ट्रात ३ आठवड्यांचं कडक लाॅकडाऊन"
SHARES

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे, पुढच्या १० दिवसांत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून १० लाखांवर पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. अशा स्थितीत केवळ विकेंड लाॅकडाऊन नव्हे, तर ३ आठवड्यांचा कडक लाॅकडाऊन लावण्याची गरज लागू शकते, असं वक्तव्य करत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

विकेंड लाॅकडाऊनसंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी सांगितलं की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व तऱ्हेच प्रयत्न अत्यंत कसोशीने करण्यात येत आहेत. परंतु हा संसर्ग इतका झपाट्याने फैलावत चाललाय की त्याला वेळीच आवर न घातल्यास मनुष्यबळ कमी पडू शकतं. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. राज्य सरकार अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या  साडेपाच हजार डॉक्टरांना थेट मैदानात उतरवत आहे. तरी देखील मनुष्यबळ कमी पडत आहे.

हेही वाचा- अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात ७ व्या क्रमांकावर

वाढणाऱ्या रुग्णसंख्येकडे पाहता पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विकेंड लाॅकडाऊन करण्यापलिकडे सरकारच्या हातात इतर कुठलेही पर्याय उपलब्ध नव्हते. एवढंच नाही, तर गर्दी टाळण्यासाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, हा उद्रेक थांबला नाही, तर मी मुख्यमंत्र्यांना ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यास सांगणार आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात विकेंड लाॅकडाऊन लागू करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित झालेले असताना सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्येही स्थानिक प्रशासनाकडून व्यापारी, दुकानदारांना दुकाने, गाळे बंद ठेवण्यास सांगण्यात आलं. तर काही ठिकाणी सक्ती करण्यात आली. यामुळे छोटे व्यापारी, दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे. विकेंड लाॅकडाऊनचा नियम मान्य आहे, परंतु मधल्या दिवसांत किमान २ ते ३ दिवस तरी उद्योग-धंदे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

(maharashtra need full lockdown for 3 week says vijay wadettiwar)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा