Advertisement

कोरोनामुळे HIV च्या चाचणीत ६५ टक्के घट

कोरोनामुळे HIVच्या चाचणीवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनामुळे HIV च्या चाचणीत ६५ टक्के घट
SHARES

कोरोनामुळे HIVच्या चाचणीवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. प्रत्येकास ठाऊक आहे की, HIV संक्रमित रक्त, वीर्य यामुळे एचआयव्हीची लागण होऊ शकते. आतापर्यंत HIV वर कुठलाही उपचार नाही.

सामान्यत: जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लक्षणं उद्भवतात तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं जातं. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टर त्यांना चाचणीसाठी लिहून देतात. पण कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण रुग्णालयात जाणं टाळत आहेत.

१ डिसेंबर जागतिक एड्स दिनी मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटीनं (MDACS) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एचआयव्हीसाठी घेण्यात आलेल्या चाचण्या ६५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

COVID 19 चा उद्रेक होण्यापूर्वी एमडीएक्सएसनं ३२ हजार पेक्षा जास्त लोकांचं स्क्रिनिंग केलं होतं. यात संशयित रूग्ण, असुरक्षित गटातील व्यक्ती, ट्रक ड्रायव्हर्स, कैदी, समलिंगी, उभयलिंगी आणि ट्रान्सजेंडर (LGBT) समुदायाचा समावेश आहे.

गेल्या सात महिन्यांपासून, एमडीएक्सएसनं एचआयव्हीसाठी प्रत्येक महिन्यात सुमारे ११ हजार लोकांची तपासणी केली आहे. कारण निदानास उशीर होणं एचआयव्ही ग्रस्त लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतं.

एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एमडीएक्सएसच्या अहवालानुसार एकूण८३ हजार १९० जणांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३०३ जणांना HIV विषाणूची लागण झाल्याचं आढळलं आहे.



हेही वाचा

राज्य सरकार घेणार क्षयरुग्ण, कुष्ठरुग्णांचा शोध

जुलै-ऑगस्टपर्यंत २५-३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचा प्रयत्न

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा