Advertisement

डेंग्यूनंतर चिकनगुनियाचे रुग्ण महाराष्ट्र आणि मुंबईत अधिक

चिकुनगुनियाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पण डॉक्टरांनुसार घाबरण्याचं कारण नाही...

डेंग्यूनंतर चिकनगुनियाचे रुग्ण महाराष्ट्र आणि मुंबईत अधिक
SHARES

कोरोनानंतर राज्यात डेंग्यु आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. पण आता यासोबतच चिकुनगुन्या या विषाणुजन्य साथीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चिकुनगुन्याचीही रुग्णसंख्या १ हजार ५३७ वर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी ७८७ प्रकरणांपेक्षा १००% वाढ आहे. बहुतांश प्रकरणे नाशिक, कोल्हापूर आणि नागपूरची आहेत.

मेट्रोपोलिस लॅबच्या आकडेवारीवरून शहरात गेल्या तीन महिन्यांत चिकनगुनियाचा वाढता कल दिसून आला. जुलैमध्ये ७९० पैकी २३९ नमुने (तीन पद्धती वापरून चाचणी केलेले) पॉझिटिव्ह आले. ऑगस्टमध्ये १ हजार ९४३ नमुन्यांपैकी ही संख्या ५६४ झाली. १९ सप्टेंबरपर्यंत १ हजार ७४९ चाचणी नमुन्यांपैकी ५१० पॉझिटिव्ह होते.

शहरातील जवळपास एक डझन खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयांनी TOI ला सांगितलं की, ते ताप, पुरळ, डोकेदुखी आणि मळमळ यांच्या तक्रारी असलेल्या रुग्णांच्या स्थिर प्रवाहावर उपचार करत आहेत. चिकनगुनियाचे सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे सांध्यातील तीव्र वेदना जे वृद्ध लोकांमध्ये एक वर्षापर्यंत टिकू शकतात.

वोखार्ट हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध प्रमुख डॉ.बेहराम पारडीवाला यांनी गेल्या सहा आठवड्यांत जवळपास ४० प्रकरणांवर उपचार केले आहेत. ते म्हणाले, "रुग्णांना खूप ताप आणि सांधेदुखी होते."

बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ गौतम भन्साळी यांच्याकडे चिकुनगुनियासाठी सहा रुग्ण दाखल आहेत. “या रुग्णांना इतर वेदना आणि वेदनांसह उच्च ताप असतो. कमी झालेल्या डब्ल्यूबीसी संख्येसह काहींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.”

फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ञ डॉक्टर म्हणाले की, "मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे,"

प्रशासकिय अधिकारी म्हणाला की, कोणतीही चिंताजनक वाढ नाही. “डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही बरीच पावलं उचलत आहोत. डेंग्यु ज्यामुळे पसरतो त्यामुळेच चिकनगुनिया देखील पसरतो.”

विषाणूजन्य रोग, जीवघेणा नसला तरी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकतात, असं नानावटी रुग्णालयाच्या डॉ.हेमलता अरोरा यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यात दोन रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी एक ६८ वर्षांचे होते. ज्यांना सांधे दुखीचा त्रास अधिक जाणवला. एसएल रहेजा हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध सल्लागार डॉ.परितोष बघेल यांनी सांगितलं की, वेदना इतकी भयंकर असू शकते की २७ वर्षीय देखील गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले.

आतापर्यंत डेंग्यूचे ६ हजार ३७४ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूमुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. यातील बहुतांश केसेस विदर्भातील आहेत. लहान मुलांमध्येही या साथीचा मोठा संसर्ग झाल्याचं दिसून येत असलं तरी घाबरून न जाण्याचे व योग्य उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आलं आहे.


हेही वाचा

लवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा