Advertisement

पोलिओ लसीत व्हायरस: घाबरू नका, ११ सप्टेंबरपासून लस बंद- आरोग्यमंत्री

पोलिओ लस तयार करणाऱ्या बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाईप-२ व्हायरस आढळला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशात बायोमेड कंपनीकडून लस पुरवण्यात येते. त्यानुसार येथील काही मुलांच्या विष्ठेमध्ये पोलिओ टाईप- २ चा व्हायरस आढळून आला. त्यानंतर बायोमेड कंपनीच्या लसींची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या चाचपणीत बायोमेड कंपनीच्या लसीमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरस असल्याचं आढळून आलं.

पोलिओ लसीत व्हायरस: घाबरू नका, ११ सप्टेंबरपासून लस बंद- आरोग्यमंत्री
SHARES

गाझियाबादमधील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाईप -२ व्हायरस आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या कंपनीच्या लसीत हा व्हायरस आढळला आहे, त्या कंपनीच्या लसींचा वापर महाराष्ट्रात केला जात असल्याचंही उघड झालं आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पण नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण या कंपनीच्या लसीचा वापर महाराष्ट्रात ११ सप्टेंबर २०१८ लाच बंद करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


लस रोगप्रतिबंधक शक्तीसाठी

पोलिओमुक्त भारतची हाक देत पोलिओ निर्मूलनासाठी केंद्र सरकारकडून पल्स पोलिओ अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत इंजेक्शन आणि तोंडावाटे ५ वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओची लस दिली जाते. शरीरामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती तयार करण्यासाठी क्षीण व्हायरस या लसींमध्ये असतात. हे व्हायरस संबंधित आजाराविरूद्ध लढण्याची ताकद शरिरामध्ये निर्माण करतात.


कुठे आढळला व्हायरस?

अशी पोलिओ लस तयार करणाऱ्या बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाईप-२ व्हायरस आढळला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशात बायोमेड कंपनीकडून लस पुरवण्यात येते. त्यानुसार येथील काही मुलांच्या विष्ठेमध्ये पोलिओ टाईप- २ चा व्हायरस आढळून आला. त्यानंतर बायोमेड कंपनीच्या लसींची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या चाचपणीत बायोमेड कंपनीच्या लसीमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरस असल्याचं आढळून आलं. ही धक्कादायक बाब समोर आल्याबरोबर कंपनीसह कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर संचालकाला अटकही करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात हायअलर्ट जारी

उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आलेल्या या वृत्तामुळं महाराष्ट्रातही चांगलीच खळबळ उडाली आहे. याचं कारण बायोमेडच्या लसी महाराष्ट्रातही वापरल्या जातात. त्यामुळे उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आलं असून त्यामुळे सध्या राज्यभरात भीतीचं वातावरण आहे. पण आरोग्यमंत्र्यांनी मात्र या लसींचा वापर ११ सप्टेंबरपासूनच बंद असल्यानं नागरिकांना न घाबरण्याचं आव्हान केलं आहे. मात्र या लसींमध्ये व्हायरस आढळल्यानं देशात पुन्हा एकदा पोलिओचं संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

मुंबईतील ९६४ बालकांना लसीकरणांचा विसर

लसीकरणाच्या नावावर लोकांकडून उकळतात पैसे, भांडुपमधील प्रकार उघड



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा