Advertisement

मुंबईतील ९६४ बालकांना लसीकरणांचा विसर


मुंबईतील ९६४ बालकांना लसीकरणांचा विसर
SHARES

बालकांमधील मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणांमध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जात आहे. लसीकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये मुंबईतील ९६४ बालकांना आजार प्रतिबंधक लसच देण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. तर सुमारे १९ हजार ५१५ बालकांनाही लसीकरणाचे कोर्स पूर्ण करण्यात आले नसल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.


मिशन इंद्रधनुष्य

बालकांना पहिल्या दोन वर्षांमध्ये लसीकरण झाल्यास पुढील आयुष्यात विविध आजारांचा मुकाबला करणे शक्य होते. अर्धवट लसीकरण झालेले व लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात. त्याचसाठी लसीकरणापासून पूर्णत: तसेच काही प्रमाणात वंचित असलेल्या दोन वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालके आणि गरोदर माता यांचे डिसेंबर २०१८पर्यंत ९० टक्के  पूर्णत: लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लसीकरण मोहिम ऑक्टोबर २०१७पासून 'विशेष मिशन इंद्रधनुष्य' या नावाने सुरु केले आहे. ९ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याची माहिती उपायुक्त सुनील धामणे आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी  दिली आहे.


३२१५ गरोदर महिलांनाही पडला विसर

आपल्या देशात बालमृत्यू व प्रसुती दरम्यान होणारे मातांच्या मृत्यूचे प्रमाण  हे लसीकरणामुळे कमी केले जाणार आहे. मात्र, या लसीकरणाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेमध्ये दोन वर्षांपर्यंतच्या १ लाख ७५ हजार ८७७ बालकांचे लसीकरण केले. यामध्ये ९६४ बालकांना आजार प्रतिबंधक लस देण्यात आली नसल्याचे आढळून आले. तर ३२१५ गरोदर महिलांकडूनही लसीकरणाचा पूर्ण कोर्स पूर्ण केला  नसल्याचे आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली.


लसीकरणाचे प्रमाण कमी

पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत आढळून आलेल्या अति जोखीमग्रस्त भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. या अति जोखिमग्रस्त भागांमध्ये लसीकरणापून पूर्णत: व अंशत: वंचित असलेल्या मुलांचे जास्त प्रमाण आढळून येते. विशेष मिशन इद्रधनुष्य कार्यक्रमांतर्गत या अति जोखिमग्रस्त भागांमध्ये विशेष लसीकरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे धामणे यांनी दिली.


लसीकरणांची टक्केवारी

एप्रिल २०१५ ते जुलै २०१५

  • एकूण लसीकरण झालेल्या बालकांची टक्केवारी : ४३.७ टक्के
  • एकूण लसीकरण झालेल्या गरोदर मातांची टक्क्केवारी : ३४.२ टक्के

ऑक्टोबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६

  • एकूण लसीकरण झालेल्या बालकांची टक्केवारी : ६८.५ टक्के
  • एकूण लसीकरण झालेल्या गरोदर मातांची टक्क्केवारी : ९०.८७ टक्के

एप्रिल २०१७ ते जुलै २०१७

  • एकूण लसीकरण झालेल्या बालकांची टक्केवारी : ६६.८ टक्के
  • एकूण लसीकरण झालेल्या गरोदर मातांची टक्क्केवारी : ८७.८ टक्के

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा - 

महापालिकेचं 'मिशन इंद्रधनुष्य'!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा