Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, महाराष्ट्रानं केरळलाही मागं टाकलं

३ हजार ३६५ नव्या कोरोना रुग्णांसह राज्यानं केरळला देखील मागं टाकलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, महाराष्ट्रानं केरळलाही मागं टाकलं
SHARES

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ३ हजार ३६५ नव्या कोरोना रुग्णांसह राज्यानं केरळला देखील मागं सोडलं आहे. केरळमध्ये सोमवारी २ हजार ८८४ कोरोना रुग्ण आढळले होते.  

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रुग्णसंख्या सलग वाढत राहिल्यास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कठोर पाऊलं उचलावी लागतील. सोमवारी राज्यात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २० लाख ६७ हजार ६४३ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत तब्बल ५१ हजार ५५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यात रोज ३ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेनं धारावीतील काही क्षेत्रात मोबाईल टेस्टिंग व्हॅन तैनात केली आहे. धारावी, दादर आणि माहीम परिसरात आठवडाभरात कोरोना रुगणांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. नुकतंच राज्य सरकारनं केरळवरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक आहे.

सोमवारी देशात ९ हजार ९३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या दोन सोमवारची यासोबत तुलना केल्यास संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी रूग्णसंख्या कमी येण्याचं कारण म्हणजे वीकेंडमुळं स्टाफ कमी असल्यानं चाचण्याही कमी झाल्या होत्या. सोमवारी 4.9 लाखापेक्षाही कमी चाचण्या झाल्या. 6 महिन्यात इतक्या कमी चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ होती.



हेही वाचा

सीरमची लस वापरण्यास जगभरात परवानगी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा