Advertisement

सीरमची लस वापरण्यास जगभरात परवानगी

आता ही लस जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी वापरली जाईल.

सीरमची लस वापरण्यास जगभरात परवानगी
SHARES

ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) तयार केलेल्या कोरोना लसीच्या (Corona Vaccine) आपात्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मान्यता दिली आहे. यासह आता ही लस जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी वापरली जाईल.

जागतिक आरोग्य संघटनेनं सोमवारी कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरास मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकानं तयार केल्या आहेत. एक वॅक्सिन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट तर दुसरं दक्षिण कोरियाची एसके बायो कंपनी बनवते.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानॉम म्हणाले, की या ग्रीन सिग्नलमुळे लसीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत जगभरातील गरीब देशांना लस देण्याचा रस्ता खुला झाला आहे. जगभरातील निर्धन देशांना जागतिक आरोग्य संघटनेमार्फत कोरोनाची लस पाठवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सोमवारी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या दोन लसींच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, जिथं अजूनही कोरोनाची लस पोहोचलेली नाही अशा ठिकाणी लसीकरणाला सुरुवात केली जाईल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं की, भारत आणि दक्षिण कोरियातील दोन कंपनी एकाच लसीचं उत्पादन करत आहेत. असं असलं तरी दोन्ही प्लांट वेगळे असल्यानं त्यांची वेगवेगळी चाचणी करून परवानगी देण्यात आली आहे.



हेही वाचा

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा