होरपळून जखमी झालेल्या रुग्णांना हेलिपॅडची सुविधा

 Pali Hill
होरपळून जखमी झालेल्या रुग्णांना हेलिपॅडची सुविधा
होरपळून जखमी झालेल्या रुग्णांना हेलिपॅडची सुविधा
होरपळून जखमी झालेल्या रुग्णांना हेलिपॅडची सुविधा
होरपळून जखमी झालेल्या रुग्णांना हेलिपॅडची सुविधा
See all

मुंबई – होरपळून गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना यापुढे तात्काळ उपचार मिळणे सोपे होणार आहे. कारण लवकरच मुंबईत अशा रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी एअर अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार आहे. शक्य त्या रुग्णालयांवर हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देत अशा रुग्णालयात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रुग्णांना त्वरीत पोहचवण्यात येणार आहे. यासंबंधीचे धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिली आहे.

काळबादेवी इमारत दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या तीन अधिकाऱ्यांना त्वरीत उपचार मिळाले नसल्यानं त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. होरपळून गंभीर जखमी झालेल्यांना नवी मुंबईला न्यावे लागते. हे अंतर बरेच मोठे असल्याने उपचारांस विलंब होतो. त्यामुळे रुग्णांचे बळी जात असल्यानं एअर अॅम्ब्यूलन्सची संकल्पना पालिकेने पुढे आणली आहे. त्याचबरोबर पालिकेच्या शिव रुग्णालयातील बर्नवॉर्ड पुर्ण सुविधांनी परिपूर्ण असेल, असा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे कुंदन यांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments