Advertisement

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संपावर


इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संपावर
SHARES

केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन (राष्ट्रीय वैद्यकीय आयोग) या विधेयकाच्या विरोधात देशभरातल्या खासगी डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. शनिवारी पहाटे ६ वाजल्यापासून हा संप सुरू आहे. तर सध्याकाळी ६ वाजता हा संप मिटणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र याचा परिणाम रुग्ण सेवेवर होताना दिसत आहे.


30 जुलैला संसदेत मांडणार विधेयक

या संपात देशभरातील तीन लाख डॉक्टर्स सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 42 हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या नफेखोरीला चाप बसून पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया (एमसीआय) बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन हे नवीन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असून येत्या 30 जुलै रोजी संसदेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. जर हे विधेयक संमत झालं तर वैद्यकीय इतिहासातील हा काळा दिवस असेल, असं आयएमए डॉक्टरांचं म्हणणं आहे.

केंद्रसरकारने हे विधेयक संसदेत मांडू नये म्हणून देशभरातील डॉक्टरांनी या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करत संपाचं हत्यार उपसलं आहे.


विरोधाचं नेमकं कारण?

ब्रिज कोर्स : या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांमाना अलोपॅथीक वैद्यकीय शिक्षण दिलं जाणार आहे. ज्या अभ्यासक्रमाला एकूण ३ वर्ष लागतात, तो अभ्यासक्रम तब्बल सहा महिन्यातच पूर्ण होणार. यावरून या अभ्यासक्रमाद्वारे तयार होणाऱ्या डॉक्टरांच्या मेडिकल प्रॅक्टिसबद्दल शंका उपस्थित करण्यात आली आहे.

एक्झिट परीक्षेचं डोंगर : बारावीनंतर मेडिकलसाठी प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच सीइटीची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आता हे विधेयक मंजूर झाल्यास मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना एक्झिट परीक्षा देणे बंधनकारक असेल. परिणामी तणावाखाली येऊन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत वाढ होण्याची शक्यता उपस्थित होत आहे. 

वैद्यकीय फी मध्ये वाढ : खासगी वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत १५ टक्क्यांपर्यंत फी आकारली जात होती. परंतु ही तरतूद लागू झाल्यास खासगी रुग्णालयात आकारली जाणारी फी ही तब्ब्ल ५० टक्क्यांनी वाढेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप लागू होणार नाही. परिणामी गरीब विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याच्या स्वप्न नष्ट होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांनी नॅशनल मेडिकल कमिशन या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी एक दिवसीय संप पुकारला आहे. संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा