देहदानासाठी तरुणांनी घ्यावा पुढाकार

 Churchgate
देहदानासाठी तरुणांनी घ्यावा पुढाकार

सीएसटी - 'समाजात देहदानाबदद्ल जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुणांनी देहदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे', असे आवाहन 'फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन'चे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर जे. जे. हॉस्पिटलतर्फे दर सहा महिन्यांनी देहदान समितीची एक बैठक आयोजित करण्यात येते. देहदान चळवळीतील तसेच देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना येणाऱ्या अडचणींचा या बैठकीत आढावा घेण्यात येतो. त्यामुळे निरनिराळ्या संस्था व व्यक्तिगत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फेडरेशनमध्ये सामील व्हावे, असे आवाहन पुरुषोत्तम पवार यांनी केले.

'नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक भागातून अनेकजण संघटनेत सामील झालेले आहेत. राज्य सरकारने 30 ऑगस्टला आयोजित केलेल्या वॉकेथॉन या कार्यक्रमात संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता', असेही पवार यावेळी म्हणाले.

Loading Comments