Advertisement

आठ वर्षाच्या मुलीनं दिलं पाच जणांना जीवदान


आठ वर्षाच्या मुलीनं दिलं पाच जणांना जीवदान
SHARES

मुंबईतील लिलावती रूग्णालयात आठ वर्षाच्या मुलीचं अवयवदान करण्यात आलं असून या अवयवदानाबाबत मुलीच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयामुळे ५ जणांना जीवदान मिळालं आहे.
चर्चगेट इथं राहणाऱ्या ८ वर्षाच्या मुलीला सोमवारी सकाळी ब्रेनस्ट्रोक झाला. तिला तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केलं.


डॉक्टरांनी केलं समुपदेशन

डाॅक्टर आणि समन्वयकांच्या टीमकडून तिच्या नातेवाईकांना अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यात अालं अाणि मुलीचं अवयवदान करण्यासाठी ते तयारही झाले. त्यानुसार, तिचं हृदय फोर्टिस रुग्णालयातील बालकाला प्रत्यारोपित करण्यात आलं तर यकृत जसलोक रूग्णालयातील रूग्णाला देण्यात आलं. एक किडनी १൦ वीची परीक्षा देणाऱ्या आणि लिलावतीत उपचार घेणाऱ्या विद्यार्थीनीला प्रत्यारोपित करण्यात आली आहे. वर्षभरापासून प्रतिक्षेत असणाऱ्या या मुलीला दहावीच्या परीक्षेदरम्यानच यशस्वीरित्या किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं. दुसरी किडनी जसलोक रूग्णालयातील रूग्णाला दान करण्यात आली आहे.

मुलीचे पालक अवयवदानाचं महत्त्व ओळखून होते. त्यांना विचारल्यावर त्यांनी त्वरित होकार दिला.
- प्रमोद शिंगे, लिलावती रुग्णालयातील विभागीय प्रत्यारोपण समन्वयक


वर्षारंभापासून ३५ अवयवांचे दान

१ जानेवारी ते ६ मार्चपर्यंतच्या कालावधीत एकूण ३५ अवयवांचं दान करण्यात आलं असल्याचं विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्राकडून सांगण्यात आलं. यात एकूण १८ मूत्रपिंड, यकृत ११, हृदय ५, फुप्फुस १ अशी संख्या आहे. शिवाय, अवयवदान या चळवळीला जनमाणसांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही सांगण्यात आलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा