Advertisement

नॉन फार्मसिस्ट प्रस्तावावरून वातावरण तापलं


नॉन फार्मसिस्ट प्रस्तावावरून वातावरण तापलं
SHARES

मुंबई - नॉन फार्मसिस्टना सहा महिन्यांचं प्रशिक्षण देत फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावावरून देशभरात वातावरण तापलंय. फार्मसिस्टविरूद्ध ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटना असा संघर्षही पेटला आहे.
संघटनेचे अध्यक्ष म्हणून या प्रस्तावाचा पाठपुरावा करणाऱ्या जगनाथ शिंदे यांना महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या नामनिर्देशित पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. तर दुसरीकडे फार्मसीचे विद्यार्थी, शिक्षक, दुकान मालक आणि फार्मसिस्ट आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. फार्मसी कौन्सिलच्या सदस्यांना घेराव घालण्याबरोबरच घंटानाद आणि आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करण्याचा आमचा विचार असल्याची माहिती फार्मसिस्ट शशांक म्हात्रे यांनी दिली आहे. या आंदोलनाद्वारे प्रस्ताव मागे घेण्याबरोबरच कौन्सिल बरखास्त करण्याची मागणी ठेवण्यात येणार असल्याचंही म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा