Advertisement

कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी, ‘या’ दोन औषधांचं मिश्रण ठरतंय रामबाण

एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी १३ ते १४ दिवसांवरून कमी होऊन आता ५ ते ६ दिवसांवर आलाय.

कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी, ‘या’ दोन औषधांचं मिश्रण ठरतंय रामबाण
SHARES

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड उपचार पद्धतीनं अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयातील २०० पेक्षा अधिक रुग्म बरे झाले आहेत. हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर फक्‍त एकाच (0.5 टक्‍के) रुग्‍णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली. तर मृत्‍यू दरामध्ये तब्‍बल ७० टक्‍के घट झाली.

एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी १३ ते १४ दिवसांवरून कमी होऊन आता ५ ते ६ दिवसांवर आलाय.

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात कोविड बाधितांवर करण्‍यात आला. हा प्रयोग अत्‍यंत यशस्‍वी ठरला आहे. कोविड बाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर २०२० पासून कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्‍यात येत आहे.

अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोविड बाधित झाल्‍यानंतर त्‍यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये अत्‍यंत वेगानं सुधारणा झाली. भारतामध्‍ये अलीकडेच म्‍हणजे १० मे २०२१ रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकनं यासाठी मान्‍यता दिली.

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब ही प्रतिपिंड औषधी (antibodies medicine) आहेत. या दोन्‍ही औषधांचा मिश्रित (cocktail) वापर करून कोविड बाधितांवर उपचार केले जाऊ शकतात. ज्‍यांचे वय १२ वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन ४० किलोपेक्षा जास्‍त आहे, अशा बाधित रुग्‍णांना हे औषध दिले जाते.

सौम्‍य ते मध्‍यम (mild to moderate) स्‍वरुपात ज्‍यांना कोविडची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्‍याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्‍णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात.

महत्‍त्‍वाचं म्‍हणजे मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्‍यासारखे श्‍वसनाचे इतर तीव्र आजार, उच्‍च रक्‍तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्‍याधी इत्‍यादी आजार असलेल्यांनावर देखील उपचार करणं शक्‍य होतंय.

महापालिका आरोग्‍य प्रशासनानं ही मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोग‍िक तत्‍त्‍वावर प्रारंभी सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात राबवली आहे. आजवर २१२ कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्‍यात आले. पैकी १९९ रुग्‍णांचे उपचारअंती निष्‍कर्ष प्राप्‍त झालेत.

त्‍याचा सविस्‍तर अभ्‍यास प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे. या १९९ रुग्‍णांमध्‍ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील १०१ रुग्‍ण, ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील ४५ रुग्‍ण तर ६० वर्ष वयोगटावरील ५३ रुग्‍णांचा समावेश आहे. एकूण १९९ पैकी ७४ जणांना किमान एक तरी सहव्‍याधी (co-morbidity) आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा