Advertisement

कोरोना रुग्णांसाठी पालिकेकडून २०० रुग्णवाहिकांची व्यवस्था

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तसंच अतिजोखमीच्या व्यक्तींना रूग्णालयं आणि विलगीकरण कक्षात पाठवण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक आहेत.

कोरोना रुग्णांसाठी पालिकेकडून २०० रुग्णवाहिकांची व्यवस्था
SHARES

कोरोना रुग्णांवर उपचार करताना रुग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका रुग्णालये, विलगीकरण केंद्र अशा  १०० ठिकाणी प्रत्येकी दोन याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांची व्यवस्था करणार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तसंच अतिजोखमीच्या व्यक्तींना रूग्णालयं आणि विलगीकरण कक्षात पाठवण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक आहेत. याशिवाय कोरोना रुग्णाचा घरी मृत्यू झाल्यास त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठीही रूग्णवाहिकेची गरज भासते. मात्र, रुग्णवाहिकांची कमतरता पडत आहे. मागील आठवड्यात भांडूप व दादर येथे कोरोनामुळे दोन जणांचे मृत्यू झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी रूग्णवाहिका मिळाली. मात्र रुग्णवाहिकेत पीपीई सूट नसल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिकांची व पीपीई सूट असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.  

सरकारची १०८, पालिका व सर्व खासगी रुग्णवाहिका कोरोनासंबंधित कामात गुंतल्याने कांजूरमार्गमध्ये एका टीबी रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी 5 तास रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी मुंबईत २०० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे निर्देश पालिका मुख्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मिठाचा वापर, मागणीत प्रचंड वाढ

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा