Advertisement

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त 31 मे रोजी जनजागृती अभियान


जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त 31 मे रोजी जनजागृती अभियान
SHARES

तंबाखुमूळे कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. आजपर्यंत अनेक जीवन त्यामुळे उध्वस्त झाले आहे. हीच बाब लक्षात घेत दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. यंदा यानिमित्ताने मुंबईतील सलाम फाऊंडेशन, सामाजिक न्याय विभाग, अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि आरोग्य विभाग तीन दिवसीय तंबाखू विरोधी जनजागृती अभियान राबवणार आहे.

 

अभियानाचं उद्घाटन पडलं पार

मंगळवारी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. सलाम मुंबई फऊंडेशनतर्फे 2002 पासून तंबाखू विरोधी अभियान मुंबईसह महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांमधे राबवलं जात आहे. 

शाळा तंबाखुमुक्त व्हाव्या या हेतूने हे काम सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील 4 ते 5 हजार शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहे. शाळा तंबाखुमुक्त झाल्या तर समाज देखिल तंबाखूमुक्त होईल. तंबाखुजन्य पदार्थांमुळे दररोज भारतात 2500 लोक मरतात
दिपक पाटील, सहाय्यक व्यवस्थापक, सलाम फउंडेशन   


या अभियानांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस विभागालासुद्धा सहभागी करून घेतलं आहे. 

या मोहिमेत तंबाखूवर नियंत्रण लावण्यासंदर्भातील माहितीचं पोस्टर प्रदर्शन, व्यसनमुक्तीवर आधारित रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात येतील. शाळांमधून विविध खेळाच्या माध्यमातून तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यात येतील. तसंच 31 मे ला सर्व शाळा, पोलिस विभाग, मंत्रालयाच्या विभागांमधून तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा