फार्मासिस्टच्या कमतरतेवर नामी शक्कल

  Vidhan Bhavan
  फार्मासिस्टच्या कमतरतेवर नामी शक्कल
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईसह राज्यात औषधांच्या दुकानात फार्मासिस्ट नसल्यामुळे कित्येक वेळा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. फार्मसिस्ट पदवी असलेल्यांची संख्या कमी असल्याने औषध दुकानांच्या मालकांना फार्मासिस्ट मिळत नाहीत. याबाबत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी उत्तर दिले. 'फार्मसिस्टच्या कमतरतेमुळे आता राज्य सरकारचा औषधांच्या दुकानात बी फार्ममध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे फार्मासिस्टची कमतरता भविष्यात भासणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी या वेळी दिले. तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे असताना औषधांच्या दुकानात फार्मसिस्ट नसल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई झाली होती. त्या कारवाईचा विरोध औषध दुकानांच्या संघटनांनी केला होता, असंही ते म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.