Advertisement

महापालिकेच्या 'इतक्या' दवाखान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे

महापालिका आपल्या १८९ दवाखान्यांचे अद्ययावतीकरण करणार असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे सुरू करणार आहे.

महापालिकेच्या 'इतक्या' दवाखान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे
SHARES

महापालिका आपल्या १८९ दवाखान्यांचे अद्ययावतीकरण करणार असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे सुरू करणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात फेब्रुवारीअखेरपर्यंत किमान १० आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

या ठिकाणी १३९ प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार असून रुग्णांना प्रतिबंधात्मक आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबईकरांना घराजवळ प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि आजार बळावण्याआधी उपचार मिळावेत यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने पहिल्या टप्प्यात १०० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

या उपक्रमात पालिकेच्या दवाखान्यांमध्येच ही आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याठिकाणी १३९ चाचण्या करण्यात येतील. यामध्ये ५६ खासगी प्रयोगशाळाही समाविष्ट करण्यात येणार असून या ठिकाणी पालिकेच्या दरात चाचण्या करता येणार आहेत.

महापालिकेची आरोग्य सुविधा

प्राथमिक आरोग्य सेवेंतर्गत २११ आरोग्य केंद्रे, १८९ दवाखाने, २७ प्रसूतीगृहे, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि तृतीय स्तरीय आरोग्य सेवेंतर्गत ४ वैद्यकीय महाविद्यालये, ५ रुग्णालये, १ दंत महाविद्यालय आहे. पालिकेच्या मोठ्या आणि उपनगरीय रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी होणारी गर्दी कमी होणार असल्याने या रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा