Advertisement

लसणाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

लसूण जेवणाची चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही ते तितकेच फायदेशीर आहेत!

लसणाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
SHARES

डाळीला फोडणी देताना, वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी, मसाले, लोणची यांची टेस्ट वाढवण्यासाठी लसूण आवर्जून वापरला जातो. पण हा लसूण जेवणाची चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही तो तितकाच फायदेशीरही आहे. एक लसणाची पाकळीसुद्धा अनेक रोगांवर उपायकारक ठरू शकते.




गुडघेदुखीवर लसूण फायदेशीर

लसूण हा एका नैसर्गिक अँटीबायोटीकप्रमाणे काम करतो. उपाशी पोटी लसणाच्या एका पाकळीच्या सेवनाने गुढघे दुखी थांबू शकते. शरीरातील टी-सेल्स, फॅगोसाईट्स, लिंफोसाई्ट्स आदी प्रतिरोधक तत्व वाढवण्यास लसूण मदत करतो. शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लसूण महत्त्वाची भूमिका बजावतो. 


यावरही लसूण फायदेशीर

वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी लसूण उपयोगी ठरतो. याव्यतिरिक्त, कर्करोगसारख्या गंभीर रोगासोबत लढण्यासाठी मदत करतो. वैद्यकीयदृष्ट्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतो. ब्रेस्टकॅन्सरसह इतर कर्करोग कमी करण्यासाठी देखील लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाणे फायदेशीर ठरू शकते.


रक्त प्रवाह आणि हृदय 

हायपरटेन्शनची लक्षणे आढळून आल्यास लसूण खाल्ल्याने बराच आराम मिळतो. फक्त रक्त प्रवाहालाच सुरळीत करत नाही तर, हृदयाशी संबंधित गंभीर अडचणींनाही लसूण दूर करतो. लसूण लिव्हर आणि मूत्राशयाला चांगले काम करण्यास मदत करतो.


भूक वाढवते 

लसूण पचनासाठी मदत करतो आणि भूकही वाढवतो. जेव्हा तुम्हाला भीती वाटते, तेव्हा पोटात अॅसिड बनते. त्यावर लसूण एक उत्तम औषधाचे काम करतो. मानसिक ताण कमी करण्यासाठीही लसूण मदत करतो.




मधुमेह, ट्यूफस, डिप्रेशन, कर्करोगासारख्या आजारांवर नियंत्रण 

जेव्हा डीटॉक्सिफिकेशनची गरज लागते, तेव्हा एका पर्यायी उपचाराच्या रुपाने लसूण भरपूर उपयोगी ठरतो. मधुमेह, ट्यूफस, डिप्रेशन आणि काही प्रकारच्या कर्करोगाला आळा घालण्यासही लसूण उपयोगी ठरतो.


श्वसन तंत्रास मजबूत बनवते

अस्थमा, निमोनिया, सर्दी, ताप, ब्रोंकायटिस, खोकला इत्यादीवर प्रतिबंध घालण्यात लसूण फायदेशीर ठरतो.


दातदुखी दूर करतो

जर तुमच्या दातात दुखत असेल, तर लसणाची एक पाकळीसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकते. यात असलेले एन्टीबॅक्टिरिअल आणि वेदनानाशक गुण दातदुखीपासून आराम मिळवून देतात. यासाठी लसणाची एक पाकळी बारीक करून दुखत असलेल्या दाताखाली ठेवावी.


पोटाशी निगडित त्रासांना दूर करते 

लसूण पोटाशी निगडित समस्यांसाठी भरपूर फायदेशीर ठरतो. सोबतच याचे सेवन केल्याने आपल्या पोटात असलेले विषारी पदार्थही कमी होतात.


अॅलर्जीपासून दूर ठेवतो

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती आजारी पडतात. बदलत्या हवामानात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी आणि ताप हे आजार उद्भवू शकतात. या सर्दी आणि तापापासून लगेच सुटका मिळवायची असेल, तर मुलांच्या उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवावी. लसणात असलेले अँटिबॅक्टेरिअल गुण बदलत्या हवामानात होणाऱ्या आजारांपासून आपले संरक्षण करतात.



हेही वाचा

ह्रदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्यास हा घरगुती उपाय करा!

थंडीत 'असे' जपा तुमचे नाजूक ओठ!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा