Advertisement

रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्यानं होणारे फायदे

आपल्या त्वचेचं योग्य पोषण राखण्याकरिता रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्यानं होणारे फायदे
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोदर ठरलेलं रुटीनं सर्वांचंच बिघडलं आहे. कोरोनामुळं बदलतं वातावरण आणि वर्क फ्रॉम होम यामुळं बदललेली जीवनशैली, झोपेकडं होणारे दुर्लक्ष, सूर्यप्रकाश डोळ्यांना दिसत नसला तरी त्याची अतिनीलकिरणं त्वचेला हानी पोहोचवीतच असतात. या साऱ्याच गोष्टींचा आपल्या त्वचेवर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळं आपल्या त्वचेचं योग्य पोषण राखण्याकरिता रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेतली तर नक्कीच फायदेशीर ठरते. बऱ्याच लोकांना काहींना तर रात्रीच्यावेळी देखील सौंदर्य टिकविता येऊ शकतं याबद्दल माहिती नसते. तर काहींना माहिती असून, त्यात हलगर्जीपणा केला जातो. दिवसाच्या तुलनेत रात्री त्वचेचा पोत सुधारण्याचं काम होत असतं. कारण झोपेत आपल्या त्वचेलाही विश्रांती मिळते. यासाठी झोपताना मॉईश्चरायझर, नाईट क्रिम, रिप्लेनिशिंग क्रीम, सेरम यांचा वापर करता येतो. 

  • दररोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करूनच झोपावे.
  • कोणत्या त्वचेकरिता कोणते नाईट क्रीम वापरणे योग्य आहे.
  • वैद्यांना विचारूनच क्रीमची निवड करा. 
  • कोणतेही क्रिम आपल्या मनाने ठरवून वापरू नका. 
  • तुमच्या त्वचेचा पोत आणि लावले जाणारे क्रीम याचा त्वचेवर कसा परिणाम होतोय किंवा होईल तेही पाहा.
  • रात्री झोपताना वापरण्याची सर्व उत्पादने तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असतात. 
  • त्वचा तेलकट किंवा अक्रे असलेली असेल तर ज्या क्रिममध्ये जास्त पाणी असेल अशी क्रीम वापरा. 
  • वारंवार वापरायचे की नाही यासाठी वैद्यांचा सल्ला घ्या, कारण याच्या अतिवापरामुळे मुरमेही येऊ शकतात.

दिवसभरात त्वचेचा धुळ, माती, प्रदूषण, मेकअप, सौंदर्यप्रसाधने अशा अनेक हानिकारक गोष्टींसोबत संपर्क होत असतो. ज्यामुळं त्वचेचं मुळ स्वरूप झाकलं जातं. मात्र रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही चेहरा पाण्यानं स्वच्छ करता तेव्हा तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. त्वचेला नैसर्गिक क्लिझिंग, टोनिंग आणि मॉश्चराईझिंग ट्रिटमेंट मिळाल्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते.

त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी त्वचेवर सीरम लावणं गरजेचं आहे. तुम्हाला हवं असल्यास अँटी एजिंग सीरमचाही वापर करू शकता. त्वचा तेलकट असल्यास तुम्ही सॅलिसिलिक अ‍ॅसिड आणि रेटिनॉल फेस सीरम लावा. घरगुती सीरम म्हणून तुम्ही कोरफडीचा रस काढून एका बाटलीमध्ये साठवून ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा. पण ताज्या रसाचा वापर नेहमी करावा. रात्री झोपण्या आधी त्वचेला मॉश्चराइजरच्या मदतीनं मॉश्चराइज करणं फार चांगली सवय आहे. यामुळं त्वचेवरील डेड स्कीन तर निघेलच सोबतच त्वचेला पोषण देखील मिळेल.

दिवसाच्या तुलनेनं रात्रीच्या वेळी त्वचा सक्रिय घटक अधिक प्रमाणात शोषून घेतं. रात्री झोपेत त्वचेच्या पेशीनिर्मितीचा वेग अधिक असतो. त्यामुळं नाईट क्रिमच्या माध्यमातून त्वचेचं पोषण करण्यासाठी हीच योग्य वेळ असते. रात्री रक्ताभिसरण अधिक वेगात होते आणि स्कीन केअर उत्पादनांमधील पोषक घटकांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतलं जातं. नाईट क्रीम लावल्यामुळं सकाळी तुमच्या त्वचेला ताजेपणा व उजळपणा प्राप्त होतो.



हेही वाचा -

Mahajobs: बेरोजगारांची झुंबड, अवघ्या ४ तासांत ‘महाजॉब्स’वर ‘इतक्या’ जणांची नोंदणी

तरूणांनो, नोकरी शोधताय? राज्य सरकारने बनवली ‘ही’ वेबसाईट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा