Advertisement

'बेस्ट'मध्येही आढळला कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी

आता बेस्टमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झालेला पहिला कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

'बेस्ट'मध्येही आढळला कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. यामध्ये बेस्ट बसचीही सेवा सुरू आहे. मात्र, आता बेस्टमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झालेला पहिला कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

बेस्टमध्ये कोरोना शिरल्यानं आता चिंता व्यक्त केली जात असून सफाई कामगारांनंतर आता बेस्टमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. वडाळा डेपोमध्ये फोरमन म्हणून हा कर्मचारी काम करत होता. या कर्मचाऱ्याला एस. आर. व्ही. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही 14 दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवलं जाणार आहे. टिळकनगर इमारतीमधील लोकांनी कोरोनाच्या भीतीनं आता स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात गुरुवारी 88 नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 423वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातील 54 रुग्ण मुंबईत असून 9 जण अहमदनगरचे, 11 पुण्यातले आहेत. याशिवाय 9 जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. नवी मुंबईत 9, औरंगाबादचे 2 सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे तर 42 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.



हेही वाचा -

धारावीतील डॉक्टरला कोरोनाची लागण, हॉस्पिटलसह 14 मजल्यांची इमारत सील

मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा