Advertisement

कर्मचाऱ्यांना रेमेडेसिव्हिर औषध पुरवतंय बेस्ट

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमेडेसिव्हिर औषधाची सध्या बाजारात कमतरता आहे. पण बेस्ट आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे शक्य होईल ते करत आहे.

कर्मचाऱ्यांना रेमेडेसिव्हिर औषध पुरवतंय बेस्ट
SHARES

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमेडेसिव्हिर औषधाची सध्या बाजारात कमतरता आहे. पण असं असलं तरी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) आपल्या कर्मचार्‍यांना रेमेडेसिव्हिर हे औषध पुरवत आहे.

वाशी इथल्या ५७ वर्षीय बेस्ट चालकाला ३० जून रोजी NMMC रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. औषधाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे स्थानिक अधिकारी रेमेडेसिव्हिरची सुविधा पुरवू शकत नव्हतं. पण चालकावर उपचार करता यावेत म्हणून बेस्टनं रेमेडेसिव्हिर औषधाची व्यवस्था केली.

बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर अनिल कुमार सिंघल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बेस्टकडे रेमेडेसिव्हिरचा आपतकालीन साठा आहे. तो बेस्टच्या कर्मचार्‍यांच्या उपचारासाठी वापरण्यात येईल.

कोरोनाव्हायरस विरूद्धच्या लढ्यात रेमेडेसिव्हिर हे औषध प्रभावी ठरत आहे. काही चाचण्या केल्यानंतर औषध निर्मात्यांना COVID 19  उपचारासाठी हे वापरण्याची परवानगी FDAकडून मिळाली आहे. हे एक अँटीव्हायरल औषध आहे. COVID 19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेनं मंजूर केलेलं पहिलं औषध आहे. इबोलाविरोधात लढण्यासाठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. आता त्याचा उपयोग कोरोनाव्हायरस विरोधात लढण्यास देखील होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बंगळुरू आणि दिल्लीप्रमाणेच मुंबईमध्येही रेमेडेसिव्हिर आणि टोकलिझुमब सारख्या जीवनरक्षक औषधांची कमतरता आहे. मुंबईतील रुग्णालये औषधं थेट निर्मात्याकडून मिळतात. या व्यतिरिक्त, शहरातील दोन स्वतंत्र वितरक, एस के डिस्ट्रिब्यूटर्स आणि भायखळा फार्मसी अण्ड स्टोअर्स देखील निर्मात्यांकडून औषधांचा पुरवठा करतात. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं या औषधाचा जागतिक साठा देखील विकत घेतला. यामुळे यूके, युरोप किंवा उर्वरित जगासाठी कोणताही साठा शिल्लक नाही.



हेही वाचा

बेस्टचे पास वितरण आणि नुतनीकरण केंद्र गुरूवारपासून सुरू

'बेस्ट'ला दररोज ८० लाखाहून अधिक उत्पन्न

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा