Advertisement

बेस्टचे पास वितरण आणि नुतनीकरण केंद्र गुरूवारपासून सुरू


बेस्टचे पास वितरण आणि नुतनीकरण केंद्र गुरूवारपासून सुरू
SHARES

अनलॉक 1.0 च्या अंतर्गत महापालिका प्रशासनानं सामान्यांना बेस्ट प्रवासाची परवानगी दिली. त्यामुळं मागील ३ महीने बंद असलेली बस पास वितरण व पास नुतनिकरण सेवा पुन्हा सुरु केली. प्रवाशांच्या सोयीसाठी ९ जुलैपासून पास वितरण व नुतनीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाची नियमित बस सेवा ८ जूनपासून सुरू झाल्यानंतरही पास सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागत होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं तसंच, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नगरिकांना घरी राहण्याच आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार, मागील ३ महीने नागरिकांनी घरी राहणं पसंत केलं. मात्र, यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यानाच कामासाठी घराबाहेर पडण्याची मुभा होती. तसंच, यांच्यासाठी बेस्टनं आपली वाहतूक सेवा सुरु ठेवली होती. मात्र, सामान्यांना प्रवास करण्यासाठी परवानगी नसल्यामुळं त्यांच्या ३ महिन्याचा पास वाया जाणार असल्याची भीती त्यांना सतावत होती. मात्र बेस्टन अखेर या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.

२२ मार्च ते ७ जून या कालावधीत ज्या प्रवाशांना उपक्रमाच्या बस सेवेचा लाभ घेता आला नव्हता, त्या प्रवाशांच्या बसपासचा वैधता कालावधी ‘उपभोगता न आलेल्या शिल्लक दिवसांच्या कालावधीकरीता’ विस्तारीत करण्यात येत आहे. प्रवाशांना या विस्तारीत कालावधीची वेगळी पावती प्रदान करण्यात येईल. या पावतीवर ‘विस्तारित’ वैधता कालावधी दर्शविण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली.



हेही वाचा - 

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा