Advertisement

भंडारा ठरला राज्यात पहिला कोरोनामुक्त जिल्हा

जिल्ह्यात रुग्ण नसले तरी सर्वांनी अधिक काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग होणार नाही यावर भर द्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केलं आहे.

भंडारा ठरला राज्यात पहिला कोरोनामुक्त जिल्हा
SHARES

महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. भंडारा हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरला आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

ट्रेसिंग, टेस्ट व ट्रिटमेंट या त्रिसूत्री तसंच योग्य नियोजन व सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. उपचाराखाली असलेल्या एकमेव रुग्णाला शुक्रवारी रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. जिल्ह्यात रुग्ण नसले तरी सर्वांनी अधिक काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग होणार नाही यावर भर द्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केलं आहे. 

भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण मागील वर्षी 24 एप्रिल रोजी आढळला होता. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली. जिल्ह्यात शेवटचा रुग्ण 23 जुलैला आढळला होता. शुक्रवारी हा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही. 

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 59 हजार 809 कोरोना  रुग्ण आढळून आले होते. तर 1 हजार 133 लोकांचा मृत्यू झाला आहे.  58 हजार 678 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्याच्या 9.5 लाख लोकसंख्येच्या 40 टक्के लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर 15 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

दरम्यान, धुळे हे राज्यातलं पहिलं कोरोनामुक्त ठरलं आहे. शहरात 25 जुलैपासून एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. तर 3 ऑगस्टपासून शहरात कोरोना रुग्णही नाहीत. योग्य नियोजन, कडक लॉकडाऊन आणि लसीकरणाचं चांगलं प्रमाण, यामुळे शहर कोरोनामुक्त झालं आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा