Advertisement

द्रविताच्या उपचारांचा खर्च भाटिया रूग्णालयाने उचलला


द्रविताच्या उपचारांचा खर्च भाटिया रूग्णालयाने उचलला
SHARES

चालत्या ट्रेनमध्ये भामट्या चोराने हल्ला केल्यामुळे आपला उजवा पाय आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झालेल्या द्रविता सिंगच्या उपचाराचा संपूर्ण खर्च भाटिया हॉस्पिटलनं उचलला आहे. त्यामुळे द्रविताच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.


असा घडला दुर्दैवी अपघात

७ फेब्रुवारी रोजी सकाळी ऑफिससाठी द्रवितानं कल्याणहून सीएसटीएमकडे जाणारी ट्रेन पकडली होती. सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन सोडल्यावर ट्रेन स्लो झाली. मोबाईलवर बोलत असलेली द्रविता रेंज गेली म्हणून दारात येऊन उभी राहिली. द्रविता मोबाईलवर बोलत असतानाच ट्रॅकच्या बाजूला असलेल्या लाईट पोलवर उभ्या भुरट्या चोराने द्रवितावर काठीने हल्ला केला. यामुळे तोल जाऊन द्रविता ट्रेनमधून खाली पडली.

द्रविता दुसऱ्या ट्रॅकवर पडली. मात्र दुसऱ्या दिशेनेही लोकल येत असल्यामुळे द्रविताने सर्व शक्तीनिशी स्वत:ला ट्रॅकवरून बाजूला केले. मात्र तरीही तिचा उजवा पाय आणि डाव्या हाताची बोटं ट्रेनच्या खाली आली. गंभीर जखमी झालेल्या द्रविताला तातडीने भाटिया रूग्णालयात दाखल करण्यात आलं.


रूग्णालयाने दाखवली माणुसकी

दरम्यान, द्रवितावर गुजरलेल्या बाक्या प्रसंगामुळे माणुसकीच्या नात्याने तिच्या उपचाराचा १०० टक्के खर्च उचलण्याचा निर्णय भाटिया रूग्णालय प्रशासनाने घेतला आहे. तशा प्रकारचे परिपत्रकच रूग्णालयाकडून काढण्यात आले आहे.

उपचारांचा खर्च उचलल्यामुळे द्रविताच्या वेदना कमी होणार नाहीत. पण आम्ही हॉस्पिटल म्हणून तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी इतकंच करू शकतो. द्रविताची प्रकृती आता स्थिर असून भाटिया हॉस्पिटलच्या सर्वोत्तम डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. राजीव बावधनकर, सीईओ, भाटिया हॉस्पिटल



हेही वाचा

ट्रेनच्या दारात उभं रहाणं द्रविताला भोवलं, तीन बोटं आणि पायावरून गेली ट्रेन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा