कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी दादरमध्ये रक्तदान शिबीर

 Dadar
कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी दादरमध्ये रक्तदान शिबीर
Dadar , Mumbai  -  

दादर - हनुमान जयंती उत्सव मंडळाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त दादर- नायगाव येथील जुन्या बीडीडी चाळीच्या पटांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत टाटा रुग्णालयातील कर्करोगग्रस्त बाल रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

टाटा रुग्णालयातील कर्करोगग्रस्त बाल रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असते. त्यामुळे दादर-नायगाव हनुमान जयंती उत्सव मंडळाच्या वतीने यात खारीचा वाटा म्हणून गेल्या 5 वर्षांपासून श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या शिबिरातून जमा होणारे रक्त टाटा रुग्णालयाला देण्यात येते, असे मंडळाचे प्रतिनिधी सचिन पाटणकर यांनी सांगितले. 

टाटा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या मात्र रस्त्यावर अथवा ट्रस्टमध्ये राहून आयुष्य जगणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीच्या दिवशी एक दिवसाचे अन्न गेल्या आठ वर्षांपासून पुरवण्यात येत आहे. 

Loading Comments