Advertisement

५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा मुंबईत उपलब्ध


५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा मुंबईत उपलब्ध
SHARES

'रक्तदान श्रेष्ठ दान' असं म्हणत दरवर्षी हजारो नागरिक रक्तदान करतात. पण यावर्षी कोरोनाचं सावनट असल्यामुळे रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. गेल्या ५ महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्यानं पुढील ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

मुंबईत कोरोनाचे संक्रमण होण्यापूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीरं दर महिन्याला मुंबईत आयोजित होत होती. मात्र कोरोनामध्ये हजार ते बाराशे शिबीरं झाली आहेत. या कालावधीत ५० टक्के रक्तदानात घट झालेली आहे. 

पूर्वी ५० टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर १५ टक्के कॉलेज आणि ३५ टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबीरातून रक्त उपल्बध व्हायचे. मात्र कोरोनामुळे ५ महिन्यात ते शक्य होऊ शकलं नाही. परिणामी रक्तसाठ्याची कमतरता निर्माण होऊ लागली आहे.

प्रशासनाच्या वतीनं सामाजिक संस्था आणि नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी केलं आहे. नवरात्रोत्सवामध्ये आरोग्य शिबिरं भरवून रक्तसाठा पुन्हा सुस्थितीत करण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत.हेही वाचा

मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश

धक्कादायक! तपासणी केली नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement