Advertisement

धक्कादायक! तपासणी केली नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची चाचणी केली नसतानाही कोरोना झाला असं सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे.

धक्कादायक! तपासणी केली नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

कोरोनाची चाचणी केली नसतानाही कोरोना झाला असं सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे. एवढंच नाही तर या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हा असं वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे या व्यक्तीने आरोग्य विभागाविरोधात पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. 


कोरोनाची चाचणी केलेली नसतानाही पॉझिटिव्ह अहवाल आल्याचं ऐरोलीतील सेक्टर ४ येथे राहणाऱ्या सोपान आढाव यांना सांगण्यात आलं. सोपान आढाव यांनी ९ ऑक्टोबरला महापालिकेच्या ऐरोली सेक्टर ३ येथील जिजामाता रुग्णालयात अँटीजेन टेस्ट केली होती. अर्ध्या तासात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर आढाव यांनी आपला अहवाल  खासगी डॉक्टरांना दाखवला. या डॉक्टरांनी त्यांना स्वॅब टेस्ट करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी चाचणी केली नाही.


पण ११ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता पालिकेच्या रबाळे आरोग्य विभागातून आढाव यांना त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं सांगण्यात आलं. तसंच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल व्हा, असंही सांगितलं. मात्र, आपण स्वॅब टेस्ट केली नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह आला कसा असं आढाव यांनी सांगितलं. मात्र, तरीही त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी सांगितलं जात होतं. 


या प्रकाराने त्रास झाल्याने आढाव यांनी माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्या कानावर ही बाब घातली. मढवी रबाळे आरोग्य विभागातील डॉ. पूनम राठोड यांना याबाबत विचारले असता आढाव यांच्या मोबाइलवर कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल आला. अहवाल पाहिल्यावर आढाव यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी रुग्णालय गाठले. मात्र या विषयांवर बोलण्यास तेथील डॉक्टरांनी नकार दिला. त्यामुळे आढाव यांनी अखेर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी  दोन दिवसांत या या घटनेची चौकशी करण्याचं आश्वासन त्यांना दिलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत एका दिवसात विक्रमी १६,७०० चाचण्या

आता अल्प दरात उपलब्ध होणार रेमडिसेव्हिर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा