Advertisement

'या' कोरोना रुग्णालयांतील सामग्री एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचारांसाठी सुरू करण्यात आलेले जम्बो रुग्णालय महापालिकेकडून बंद करण्यात आले.

'या' कोरोना रुग्णालयांतील सामग्री एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुरभाव कमी झाला असून, अनेक निर्बंधही शिथील करण्यात आले. तसंच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचारांसाठी सुरू करण्यात आलेले जम्बो रुग्णालय महापालिकेकडून बंद करण्यात आले. बंद केलेल्या ४ जम्बो कोरोना केंद्रांतील सुमारे ६ हजारांहून अधिक साधारण आणि प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा, ५०० अतिदक्षता खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रणा इत्यादी उपकरणे आणि सामग्री एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांनी यासाठी प्रस्तावही पाठविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरल्यानं महापालिकेनं गोरेगावचे नेस्को, मुलुंड र्चिडसन अ‍ॅण्ड क्रुडास, दहिसर आणि कांजूरमार्ग ही जम्बो कोरोना रुग्णालये १ मार्चपासून बंद केली आहेत.

कांजूरमार्गचे कोरोना केंद्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कार्यान्वित झाले. परंतु अन्य ३ रुग्णालये ही कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये पूर्ण काळा सुरू होती. आवश्यक सामग्री काही राज्य आणि केंद्र सरकारकडून प्राप्त झाली होती. तर बहुतांश सामग्री पालिकेने खरेदी केली आहे.

गोरेगावच्या नेस्को कोरोना केंद्राची सुमारे ३७०० खाटांची क्षमता होती. यात २०० खाटांचा अतिदक्षता विभाग होता. रुग्णालय बंद होणार याची कल्पना महापालिकेनं दिल्यानं खाटा, शेजारचे टेबल, रुग्णांसाठी आवश्यक सर्व उपकरणे, अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसनयंत्रणेसह सामग्री यांची यादी बनविण्यास सुरुवात केली होती. यातील काही उपकरणांची यादी आधीच पालिकेच्या रुग्णालयांना पाठविलेली आहे.

यातील कूपर, नायर, केईएम, शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय यांनी आवश्यक सामग्रीचे प्रस्तावही पाठविण्यास सुरुवात केली आहे. यातील आवश्यक खाटा, खुर्च्या इत्यादी आवश्यक सामग्री नायर दंत रुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी पाठविले जात आहे. आलेल्या प्रस्तावांना पालिकेने मंजुरी दिल्यावर हे सामान त्या त्या रुग्णालयांमध्ये हलविले जाईल. तूर्तास या सर्व प्रक्रियेस जवळपास एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे,

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा