Advertisement

कोरोना चाचणी केल्यानंतर २४ तासात अहवाल देण्याचे निर्देश

खासगी प्रयोगशाळांनी संशयितांचे नमुने घेतल्यानंतर तीन ते चार दिवस रुग्णाला अहवालाची वाट पहावी लागते. ती व्यक्ती बाधित असेल तर संसर्गाचा धोकाही असतो.

कोरोना चाचणी केल्यानंतर २४ तासात अहवाल देण्याचे निर्देश
SHARES

कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट 24 तासात द्यावा असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी खासगी प्रयोगशाळांना दिले आहेत. संशयित व लक्षणे असलेल्या व्यक्तींचे नमुने घेतल्यानंतर २४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून अहवाल संकेतस्थळावर टाकावेत आणि त्याची प्रत महापालिकेकडेही पाठवावी, असे आदेश खासगी प्रयोगशाळांना देण्यात आले आहेत.

खासगी प्रयोगशाळांबद्दल येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींबरोबर व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे बैठक घेतली. परदेशातून आलेल्या तसंच घरीच विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या आत करावी, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. 

खासगी प्रयोगशाळांनी संशयितांचे नमुने घेतल्यानंतर तीन ते चार दिवस रुग्णाला अहवालाची वाट पहावी लागते. ती व्यक्ती बाधित असेल तर संसर्गाचा धोकाही असतो.  अनेकदा खासगी प्रयोगशाळा सवडीने एकत्रितपणे अहवाल संकेतस्थळावर टाकतात व पालिकेला कळवतही नाहीत. त्यामुळे पालिकेच्या आकडेवारीतही तफावत येते. अनेकदा रुग्णांचे संपर्क क्रमांक, पत्ता नीट नोंदवून घेतलेला नसतो. तसेच डॉक्टरांनी तपासणी करण्याची चिठ्ठी अहवालासोबत नसते. अशा अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी शुक्रवारी खासगी प्रयोगशाळांना फैलावर घेतले.

या बैठकीत आयुक्तांनी प्रयोगशाळांनी वैद्यकीय चाचणी अहवाल काटेकोरपणे, बिनचूकपणे व वेळेच्या वेळेत संबंधित संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत अहवाल अपलोड करण्यास विलंब होणार नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे प्रयोगशाळांनी लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी निर्देश दिले. 



हेही वाचा -

एमबीए सीईटीचा निकाल जाहिर

मुंबईला ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा