Advertisement

मुंबई महापालिकेकडून डासांची उत्पत्तीस्थानं नष्ट

मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने टोलेजंग इमारती, चाळी, गृहनिर्माण सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमध्ये शोध मोहीम राबवून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत.

मुंबई महापालिकेकडून डासांची उत्पत्तीस्थानं नष्ट
SHARES

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. दरवर्षी या आजारांमुळे अनेकांचा बळीही जातो. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दरवर्षी शोध मोहीम राबवून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली जातात. यंदाही मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने टोलेजंग इमारती, चाळी, गृहनिर्माण सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमध्ये शोध मोहीम राबवून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. पालिकेने एक लाख आठ हजार २६ छोटय़ा-मोठय़ा वस्तू, ५१४ टायर्स  हटविले आहेत. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.

बाटलीचे झाकण, डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोपांच्या कुंडय़ांखालील ताटल्या, चहाचे कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंटय़ा, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यांसारख्या विविध वस्तूंमध्ये पाणी साचल्यामुळे  डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अशा वस्तू हटविणे आवश्यक असते. कीटकनाशक विभागाने १ जानेवारीपासून मुंबईत विविध ठिकाणांहून एक लाख आठ हजार २६ वस्तू आणि ५१४ टायर्स हटवले आहेत.

भायखळा (ई विभाग) परिसरातून डासांची उत्पत्तीस्थाने बनू पाहणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १६ हजार ३५५ वस्तू हटविण्यात आल्या. त्याखालोखाल जी-दक्षिणमधून नऊ हजार ३५८, एमधून आठ हजार ३२ वस्तू हटविण्यात आल्या. तसेच  एफ-दक्षिण विभागातून सर्वाधिक म्हणजे १२३ टायर्स हटविण्यात आले आहेत. 



हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा