Advertisement

पालिकेचे डॉट्स सेंटर्स पुरवणार क्षयरोगग्रस्तांना रेशन!


पालिकेचे डॉट्स सेंटर्स पुरवणार क्षयरोगग्रस्तांना रेशन!
SHARES

एखाद्या व्यक्तीला टीबी म्हणजेच क्षयरोग झाला की पहिल्या दोन महिन्यांत आपोआपच त्या रुग्णाच्या आरोग्याची पातळी खालावते. पण, याच काळात रुग्णांना सर्वात जास्त चांगल्या आणि पौष्टिक आहाराची गरज असते. म्हणूनच, पालिकेच्या डॉट्स सेंटर्सकडून अशा टीबी रुग्णांना पहिले दोन महिने रेशन पुरवलं जाणार आहे.

ज्या रुग्णांची डॉट्स सेंटर्समध्ये नोंदणी असेल, अशा रुग्णांना हे रेशन दिलं जाणार आहे. या रेशनमध्ये डाळ, तांदूळ, शेंगदाणे, गूळ, चणे असा पौष्टिक आहार पहिले दोन महिने या रुग्णांना पुरवला जाणार आहे. प्रत्येक महिन्यात जवळपास ८ ते ९ किलोचं रेशन रुग्णांना पुरवलं जाणार आहे.

प्रत्येक महिन्यात ८ ते ९ किलो पौष्टिक रेशन टीबी रुग्णांना पुरवण्याचा विचार आहे. डॉट्स केंद्रात नोंदणी असलेल्या रुग्णांना हे रेशन दिलं जाणार आहे. शिवाय, रुग्णांना स्वच्छता किट देखील देण्यात येईल.

डॉ. दक्षा शाह, प्रमुख, टीबी नियंत्रण विभाग, मुंबई महानगरपालिका

टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे पोषक आहाराची गरज मोठ्या प्रमाणार असते. त्यामुळे टीबी रुग्णांना पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे.



हेही वाचा

महापालिका घरोघरी जाऊन घेणार टीबीच्या रुग्णांचा शोध


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा